सफेद केसांनी हैराण? गुळासोबत खा हा पदार्थ…
सफेद केसांची (hair) पुन्हा एकदा चर्चा रंगलीय. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल म्हणजे अभिनेता दिलीप जोशी यांच्या मुलीचे नियती जोशीचे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंत नियतीचे सफेद केस दिसत आहेत.
अनेकांना आपल्या सफेद रंगाच्या केसांना लपवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. वेगवेगळ्या कंपन्यांचे रंग, मेहंदी, हेअर कलर्स करून पांढरे केस लपवण्याचा प्रयत्न केला जातो.
मात्र असं न करता नैसर्गिक पद्धतीने तुमचे केस काळे राखू शकता. केसांचा काळा रंग टिकवून ठेवण्यासाठी अनेक होम रेमेडिज फायदेशीर ठरू शकतात. त्यातील एख म्हणजे गुळ. गुळ हे अधिक गुणकारी आहे.
गुळासोबत मेथी हे अतिशय गुणकारी आहे. यामुळे तुमच्या केसांची (hair) वाढ देखील अधिक होते. आणि केसगळती थांबते. मेथीच्या दाण्यांचे सेवन केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात गूळ मिसळून खाल्ल्यास दुप्पट फायदा होतो. यासाठी मेथीच्या दाण्यांचे चूर्ण बनवून त्याचे गुळासोबत सेवन करावे. याशिवाय मेथीच्या दाण्यांचे पाणी लावल्याने केसांशी संबंधित समस्याही दूर होतात. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे पाणी केसांना लावा.
दुसरा उपाय म्हणजे मेथीचे दाणे टाकून पाणी उकळणे आणि या पाण्याने केस धुणे.
मेथीच्या दाण्यांची पेस्ट बनवून केसांना लावा. हे 15 ते 20 मिनिटे केसांवर ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. खोबरेल तेलात मेथी पावडर टाकून ते गरम करून केसांना मसाज करा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल. मेथी दाणे आणि लिंबाची पेस्ट केसांच्या समस्याही दूर करते. त्यामुळे केस चमकदार होतात.