टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोरोनाचं सावट! स्पर्धेआधी यजमान बोर्डाचा मोठा निर्णय

(sports news) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर असून येत्या २६ तारखेपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला  सुरुवात होईल. टीम इंडियाच्या दृष्टीने हा दौरा अतिशय महत्त्वाच असणार आहे कारण दक्षिण आफ्रिकेत भारताला आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकता आलेला नाही. पण या दौऱ्यावर कोरोनाचं सावट पसरलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचं संकट
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने कोविड-19 चा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी देशातील चार दिवसीय स्थानिक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्याच्या एक आठवडा आधी CSA ने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही आठवड्यांत दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

CSA ने जारी केलेल्या निवेदनानुसार कोरोनाचा धोका आणि सुरक्षेची उपाययोजना म्हणून स्थानिक क्रिकेट स्पर्धेचे पाचव्या फेरीतले सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हे सामने 16 ते 19 डिसेंबर (विभाग दोन) आणि 19 ते 22 डिसेंबर (विभाग एक) या कालावधीत होणार होते. आता पुढे ढकललेले हे सामने नवीन वर्षात खेळवले जातील. (sports news)

भारताचं दक्षिण आफ्रिकेतलं वेळापत्रक

पहिला कसोटी सामना – 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरियन

दुसरा कसोटी सामना – ३ ते ७ जानेवारी, जोहान्सबर्ग

तिसरा कसोटी सामना – 11 ते 15 जानेवारी, केपटाऊन

पहिला एकदिवसीय सामना – १९ जानेवारी, पर्ल

दुसरा एकदिवसीय सामना – २१ जानेवारी, पर्ल

तिसरा एकदिवसीय सामना – २३ जानेवारी, केपटाऊन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *