महाडिकांची हुकूमशाही मोडीत काढणार
लोकशाहीची ताकद काय आहे, हे दाखवण्याची हीच वेळ आहे. महाडिकांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीला सत्ता (power) द्या, तिजोरीच्या किल्ल्या आमच्या हातात आहेत, त्यामुळे विकास आम्हीच करू शकतो, समितीची सत्ता हातात द्या, वर्षात वडगाव बाजार समिती राज्यात पहिल्या क्रमांकावर नेतो, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. येथील वडगाव समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ शेतकरी संघ हॉलमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
श्री. पाटील म्हणाले, या निवडणुकीत एका बाजूला नेते तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते, अशी निवडणूक आहे. एका बाजूला सत्तेचे केंद्र असणारे आहेत. तर सत्ता (power) नसणारे विरोधक आहेत.
दरम्यान, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भ्रमणध्वनीवरुन भाषण केले, ते म्हणाले, ‘वडगाव समितीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. सत्तांतरानंतर समितीसाठी मोठा निधी देऊन पारदर्शक कारभार केला जाईल.
कर्नाटकचं राजभवन गाठा अन् बोम्मई सरकार पाडा; सेनेचं भाजपला आव्हान
आमदार राजू आवळे, निवेदिता माने, राजीव आवळे, मुरलीधर जाधव, प्रा. बी.के. चव्हाण, मदन कारंडे, यासिन मुजावर, सर्जेराव माने यांची भाषणे झाली. सरपंच शशिकांत खवरे, वसंतराव चव्हाण, संभाजी पोवार, मोहनलाल माळी, अजय थोरात, शीतल गाताडे, अस्ि फरास, उत्तम सावंत, शिरीष देसा नगराध्यक्ष अरुण जानवेकर, अजि पाटील, विश्वास इंगवले, झावि भालदार उपस्थित होते. भगव जाधव यांनी प्रास्ताविक केले. हर्षव चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.