दत्त साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रेणिक पाटील यांचे निधन

शिरोळ : प्रतिनिधी
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन श्रेणीक पाटील (रा. चांद-शिरदवाड) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने (death) दत्त साखर कारखाना परिसरासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे.
चांद- शिरदवाड येथील पाटील कुटुंबियांच्या वतीने निधनानंतर (death) स्वर्गीय श्रेणिक पाटील यांचा पार्थिव शिरोळ दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आणण्यात आला. दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दुःख व्यक्त करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी साखर कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद यांच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली.
स्व. पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या भू -लवाद मंडळ सदस्य यासह सहकार क्षेत्रातील विविध संस्था पातळीवर काम केले आहे. दत्त साखर कारखान्याचे संचालक ते व्हाईस चेअरमन या पदावर त्यांनी काम करून शेतकरी व कामगार यांच्याकरिता मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.