“……..त्यांनी बंदी घालून दाखवावी”- संजय राऊत

(political news) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भागातील मराठी बांधवांचा आवाज संघर्ष याचं प्रतिनिधीत्त्व गेल्या 70 वर्षांपासून करत आहे. त्यांनी साठी आंदोलन केलं आहे. समितीनं त्यासाठी रक्त सांडलं आहे, बलिदान दिलं आहे. बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर देशभरात त्याचा निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं या घटनेचा लोकशाही मार्गानं निषेध केला आहे. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला असेल तर त्यांच्यावर कायद्यानं कारवाई करावी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी जबरदस्ती करुन अटक केली आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून एकीकरण समितीच्या 200 हून अधिक कार्यकर्त्यांना बेकायदा अटक केलीय. त्यांना बेदम मारहाण केली जातीय, लाठीमार केली जातीय. यावर महाराष्ट्रातील भाजपचे संवेदनशील नेते काय करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची भाषा करत आहेत. त्यांनी बंदी घालून दाखवावी, असं आव्हान थेट संजय राऊत यांनी दिलंय.

कर्नाटक प्रकरणी भाजपकडून ढोंग

केंद्राची भूमिका यासंदर्भात ढोंगी आणि दुटप्पीपणाची आहे. वारणासीला जाऊन हिंदू मतदारांना भावनिक करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी किंवा पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. शिवाजी महाराज मोगलाई विरुद्ध तळपले याची माहिती त्यांनी दिली. मात्र, कर्नाटकातील घटनेवर भाजपचे नेते तोंड उघडण्यास तयार नाहीत, हे ढोंग आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. (political news)

एनसीबीच्या मुंबईच्या अधिकाऱ्यांना गुजरातला पाठवावं
गुजरातमध्ये ड्रग्ज सापडल्या प्रकरणी विचारलं असता मुंबईतील एनसीबीची गाजलेले अधिकारी आहेत. आर्यन खानला अटक करुन तमाशा करणारे, नवाब मलिकांच्या जावयांना खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना गुजरातचा जिम्मा दिला पाहिजे. गुजरात हे अमली पदार्थाच्या वाहतुकीचं पोर्ट झालेलं दिसतंय ही धक्कादायक बाब आहे. नरेंद्र मोदींनी याकडे लक्ष द्यावं, असं संजय राऊत म्हणाले. लखीमपूर खेरीत भाजपच्या नेत्याच्या जागी काँग्रेसचा मंत्री असता तर भाजपनं तांडव केलं असतं, असं संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *