जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होईल, असे कृत्य शिवसेनेने करु नये

(political news) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) (KDCC Election 2021) बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि शिवसेनेला काही जागा देण्यासाठी त्यांना विचारले असता, शिवसेनेने आमचे पॅनेल (Shivsena) जाहीर झाले आहे. तुम्ही तुमचे पॅनेल जाहीर करा, असे सांगितल्यामुळे आम्ही आमचे पॅनेल जाहीर केले. तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या (Kolhapur district) राजकारणावर कोणताही परिणाम होईल, असे कृत्य शिवसेनेने करुन नये असे आवाहनही केल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी दिली.

दरम्यान, सत्तारूढ कडून उर्वरित तीन जागांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने, भटक्‍या जाती गटातून स्मिता युवराज गवळी (पाचगाव) व प्रक्रिया गटातून प्रदिप पाटील-भुयेकर यांचा समावेश आहे. केडीसीसी बॅंकेत महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेस, (Congress) राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे पॅनेल (Shivsena panel) असावे तसेच मित्र पक्षांनाही यामध्ये सोबत घेवून बॅंकेची निवडणूक बिनविरोध करावी, अशी चर्चा काल पासून सुरु होती. सकाळी 10 पासून ते दुपारी तीनपर्यंत पाच तास चर्चा झाली. पण ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सत्तारूढ पॅनेलच्यावतीने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुश्रीफ बोलत होते.

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. शिवसेना आमच्यासोबतच आहे. शिवसेनेला सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत सर्वांनीच प्रयत्न केला. अर्ज मागे घेण्यासाठी अर्धातास राहिला आहे. यात शिवसेनेकडून तुमचे आम्ही पॅनेल तयार झाले आहे. तुमचे पॅनेल जाहीर करा, अशा आवाहन केले होते. जिल्हा बॅंकेत सहा ते आठ जण बिनविरोध होणार असेल तर जिल्ह्याच्या राजकारणावर फारसा परिणाम होईल. असे कृत्य करु नये अशी शिवसेनेला विनंती आहे. यामध्ये, उमेदवारी जाहीर केल्याशिवाय अर्ज मागे घेणारे अर्ज मागे घेणार नाहीत.

पालकमंत्री सतेज पाटील (Satej patil) म्हणाले, जिल्हा बॅंक बिनविरोध करण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याची भूमिका अर्ज मागे घेण्याच्या अर्धा तासापर्यंत घेतली होती. स्विकृतसह दोन जागा देवून कोल्हापूर जिल्ह्यात बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे नियोजन केले होते. यावेळी, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनयकोरे माजी खासदार निविदेता माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आमदार के.पी.पाटील उपस्थित होते. (political news)

मंडलिकांना आमच्याकडे पाठवा

खासदार संजय मंडलिक (Sanjay mandlik) हे शिवसेनेच नसून सत्तारूढ गटाचे आहेत, असे जे कोण म्हणत असतील त्यांनी श्री मंडलिक यांना आमच्या पॅनेलमध्ये पाठवा, अशी मिश्‍किल टिपणी आमदार पी.एन. पाटील (PN patil) यांनी केली.

भाजपला दोन जागा

जिल्हा बॅंकेत भाजपला दोन जागा मिळाव्यात अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्या होत्या. त्यानूसार आम्ही त्या दोन जागा मिळाल्या असल्याचेही आमदार विनय कोरे यांनी सांगितले.

प्रस्ताव फेटाळला

सकाळी बाबासाहेब पाटील हे खासदार संजय मंडलिक यांच्यासोबत शिवसेनेच्या गोटात जाऊन बसले. त्यानंतर सत्तारूढकडून जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील आणि राजेश लाटकर यांच्याकडून निरोप देऊन बोलावले. श्री पाटील गेले त्यांना स्वीकृत संचालक घेण्याची ग्वाही दिली पण बाबासाहेब पाटील यांनी तो प्रस्ताव फेटाळून निवडूक लढवणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *