कॅप्टन बनताच Rohit Sharma चा कहर
(sports news) टीम इंडियाचा टी 20 संघाच कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवस खुप खास आहे. भारतीय क्रिकेट(India Cricket) आणि हिटमॅन रोहित शर्मासाठीही (Rohit Sharma) हा दिवस विशेष आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली आजच्याच दिवशी रोहितनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली होती.
आजच्या दिवशी त्याने 2017 मध्ये श्रीलंका विरुद्ध आपल्या टी 20 करिअरमधील विक्रमी शतक झळकावले होते. रोहित शर्माचा टी 20 कर्णधार म्हणून हा दुसरा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्याने अवघ्या 35 चेंडूत स्फोटक शतक ठोकले. या सामन्याच्या केवळ 9 दिवस आधी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी रोहितने कारकिर्दीत तिसऱ्यांदा द्विशतक झळकावले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद 208 धावा कुटल्या होत्या. त्यावेळी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे-टी-20 मालिकेत खेळत नव्हता आणि संघाची धूरा रोहितच्या हाती होती.
22 डिसेंबर 2017 मध्ये इंदौर येथे श्रीलंका विरुद्ध सीरीजचा दुसरा टी 20 महामुकाबला खेळवण्यात आला होता. रोहित आणि केएल राहुलने सलामीला उतरले होते. रोहितने 118 आणि केएल राहुलने 89 धावांची खेळ खेळली होती.
दोघांनी पहिल्या विकेटसाठी 76 चेंडूत 165 धावांची भागीदारी केली. रोहितने 43 चेंडूत 12 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 118 धावा केल्या. रोहितने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकले. दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरनेही 35 चेंडूत शतक झळकावले आहे. त्याचवेळी केएल राहुलने 49 चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 89 धावांची खेळी केली. (sports news)
भारताने टी 20 क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली
भारताने श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांत 5 विकेट गमावून 260 धावा केल्या, जी त्यावेळच्या टी 20 मधील कोणत्याही संघाची दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. ही धावसंख्या भारताचा T20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. परंतु एकूण संघांचा विचार केल्यास भारत आता 5 व्या स्थानावर आहे.
श्रीलंकेचा 88 धावांनी पराभव
श्रीलंकेने सलामीला थरंगाने 47 तर परेराने 77 धावांची खेळी खेळली. हे दोघे बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या बॉरर्सनी आक्रमक गोलंदाजी करत श्रीलंकेचा 17.2 ओव्हरमध्ये 172 धावांत डाव गुंडाळला. त्यावेळी युजवेंद्र चहल महागात पडला. त्याने चार षटकात 52 धावा दिल्या पण 4 बळ टिपण्यात यशस्वी ठरला. तर कुलदीप यादवनेदेखील चहलच्या पावलावर पाउल ठेवत लंकेच्या 3 बॅट्समनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जयदेव उनादकट आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.
On This Day In 2017: रोहित शर्माने(Rohit Sharma) 2017 मध्ये पहिल्यांदा भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. त्यावेळी त्याने वनडे क्रिकेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली होती.