शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

भोपळ्याच्या बियांमध्येही भरपूर प्रथिने असतात. 100 ग्रॅम बियांमध्ये 19 ग्रॅम प्रथिने (protein) असतात. त्यात फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन के, फॉस्फरस आणि झिंक देखील असते. यामुळे भोपळ्यांच्या बियांचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करा.

अंकुरलेले कडधान्य प्रथिने समृद्ध असतात. तसेच त्यामध्ये प्रोटीन आणि झिंक असते. त्यामुळे शरीराची प्रथिनांची गरज पूर्ण होण्यास मदत होते.

दही प्रोटीनने भरलेले असते. 100 ग्रॅम दह्यात 23 टक्के प्रोटीन असते. दररोज एक वाटी दही खाणे खूप चांगले आहे.

दुधापासून बनवलेले पनीर देखील प्रथिन्यांचा (protein) चांगला स्त्रोत आहे. त्यात कॅल्शियम देखील असते. 100 ग्रॅम पनीरमध्ये 23 ग्रॅम प्रोटीन असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *