सांगली : चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा

(crime news) सांगलीतील जत तालुक्यातील मोकाशीवाडी येथील एका माजी सैनिकास दारूचे व्यसन सोडावे म्हणून चुकीचे व बेकायदेशीर औषध देऊन तसेच मारहाण केल्याने त्या सैनिकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव दिनेश राजाराम गायकवाड (वय.४०) असे असून, याप्रकरणी चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

याप्रकरणी मयत दिनेशची पत्नी योगिता दिनेश गायकवाड (वय.३५) व दत्तात्रय महादेव पवार . (वय.२५) सुधाकर उर्फ गुंडा भानुदास गायकवाड (सर्व रा. मोकाशेवाडी) व संदिपान कचरे (रा. कोळे ता. सांगोला) या चौघा संशयितांविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद मयत दिनेशचा भाऊ गणेश राजाराम गायकवाड यांनी जत पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोकाशीवाडी येथील माजी सैनिक दिनेश गायकवाड यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे ते व्यवसन सोडण्यासाठी त्यांची पत्नी व गावातीलच दत्तात्रय पवार व सुधाकर गायकवाड हे ( दि .१९) गुरुवार रोजी येथील संशयित आरोपी संदिपान कचरे यांच्याकडे घेऊन गेले होते.

त्या दिवशी दिनेश यास दारू सोडण्याचे औषध देऊन घरी परत आणले. मात्र त्यानंतर दिनेश पुन्हा दारू प्यायला होता. त्यानंतर त्यांचा भाऊ गणेश गायकवाड यांनी, वहिनी योगिता व दत्तात्रय पवार व सुधाकर गायकवाड यांना, दिशेन यास दारू सोडण्याचे औषध देऊ नका, काहीतरी वेगळे परिणाम होतील असे सांगितले होते.

परंतु संशयित तिघांनीही काही ऐकले नाही. दिनेश यास पुन्हा दारू सोडण्यासाठी (दि.२२) बुधवार रोजी कोळे येथील संदिपान कचरे यांच्याकडे नेण्यात आले. यावेळी कचरे यांनी दारू सोडण्याचे औषध दिले. त्यानंतर थोड्यावेळाने कचरे यांनी, दिनेश यास दिलेले औषध पोटातून बाहेर येत नसल्याने त्यास पाणी पिण्यास सांगितले. परंतु दिनेश हा पाणी पित नसल्याने दारू बाहेर पडत नव्हती. म्हणून कचरे यांनी दिनेश याला प्लास्टिक पाईपने मारहाण केली. (crime news)

यामध्ये दिनेश खाटावरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागला. कचरे यांनी दिनेश यांची दारू बाहेर निघत नाही .त्याचे लिव्हर खराब झाले आहे तुम्ही त्याला ताबडतोब घेऊन घेऊन जा असे सांगितले. दिनेशला घेऊन घरी परतत असताना त्याचे अंग थंड पडल्याने जत येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

दिनेशची पत्नी योगिता गायकवाड, दत्तात्रय पवार सुधाकर गायकवाड, संदिपान कचरे यांनी मयत दिनेशला बेकायदेशीर व चुकीचे औषध देऊन पाइपने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू होईल याची कल्पना व जाणीव असतानाही असे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *