ख्रिसमससाठी माहेरी परतणाऱ्या महिलेवर काळाचा घाला

सध्या जगभरात ख्रिसमसचा जल्लोष (Merry Christmas)सुरू आहे. अशात एक दुखद घटना हिंगोलीमध्ये(IN Hingoli )समोरी आली आहे. ख्रिसमससाठी माहेरी परतनाऱ्या महिलेवर काळाने घाला घातला आहे. नेरूळ मुंबई येथून माहेरी परतताणा ही घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मुंबई येथून ख्रिसमससाठी माहेरी जाणाऱ्या महिलेचा कार अपघातात मृत्यू झाला. ही घटना हदगाव ते वारंगा राष्ट्रीय महामार्गावर २४ डिसेंबर रोजी घडली आहे. वारंगा फाट्याकडून हादगावकडे कार क्रमांक एम. एच.४६, बीझेड ६३७१ असा आहे. मार्गावर टाकलेल्या गिटीवरून कार गेलीं आणि लागूनच असलेल्या पुलाच्या कठड्यावर जाऊन उलटली.

कार वेगात आढळल्याने पुलाच्या दुसऱ्या बाजूला उलटली. मधील सर्वजण गंभीर झाले असून त्यांना नांदेड येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. निमा सुशांत यांगळ वय ३५ राहणार नेरूळ मुंबई मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदरील महिलेचे पती आणि अन्य काहीजण मुंबईहुन यवतमाळ येथील क्रिसमस सणासाठी जात होते. अशी माहिती नातेवाइकांनी दिली आहे. घडलेल्या या प्रकारामुळे सणाच्या दिवशी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. सध्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वाहन धारकाच्या हलगर्जीपणामुळे शासनाणे घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *