अभिनेत्रीची ट्विटरवरून क्रिकेटरला विचित्र ऑफर, म्हणाली…
क्रिकेटचे काही खेळाडू मैदानाप्रमाणे सोशल मीडियावरही (social media) तुफान फटकेबाजी करतात. असाच एक क्रिकेटर म्हणजे न्यूझीलंडचा ऑलराऊंडर प्लेअर जेम्स नीशम. जेम्स नीशम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव्ह दिसून येतो. असंच एकदा जेम्सने एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रश्नाला मजेदार उत्तर दिलं होतं.
जेम्स नीशमला मिळालेली विचित्र ऑफर
आयसीसी वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव झाला होता. यानंतर नीशमला सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेलेलं. परंतु अनेकांना अजूनही त्याच्याबद्दल अपुलकी वाटते. दरम्यान 2 वर्षांपूर्वी नीशमला ट्विटरवर एक विचित्र ऑफर देण्यात आली होती, ज्यावर त्याने मजेशीरपणे उत्तर दिलं होतं.
2 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट
नीशमने 2 वर्षांपूर्वी Los Angeles Airportवरून प्रवास बऱ्याचदा प्रवास केल्यानंतर भिती कमी झाल्याचं म्हटलं होतं. यावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीने नीशमला थेट माझ्या मुलांचा पिता बनशील का असं विचारलं होतं.
जेम्स नीशमच्या ट्विटवर पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारीने रिप्लाय दिला होता. तिने लिहिलेलं, ‘जिमी तुला भविष्यात माझ्या मुलाचे पिता व्हायला आवडेल? तसंच आणखी एका ट्विटमध्ये ‘जिमी आय लव्ह यू.’ असंही लिहिलं होतं. (entertenment news)
नीशमचा मजेशीर रिप्लाय
पाकिस्तानी अभिनेत्रीच्या या ऑफरला नीशमने मजेशीर उत्तर दिलं होतं. तो म्हणालेला, ‘मला वाटतं की यात इमोजीची गरज नव्हती.’ ट्विटर युजर्सना नीशमची उत्तर आवडलं आणि जिमीचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरलही झालं होतं.