कसळूबाई शिखर केलं सर अवघ्या सहा वर्षाच्या बालकाने

सांगली : सहा वर्षाच्या बालकाने कसळूबाई शिखर केलं सर - पुढारी
सांगली येथील अर्चित गणेश चौगुले या 6 वर्षाच्या मुलाने महाराष्ट्रातील ( Maharashtra)सर्वात उंच कळसूबाई शिखर सव्वादोन तासात सर केले.
भारतातील सर्वात मोठी दरी असलेल्या सांधण दरीमध्ये सुद्धा त्याने ट्रेकिंग केले. राधेय ट्रेकर्स आयोजित दोन दिवसाच्या कळसूबाई – रतनगड(Kalsubai – Ratangad) – सांधण दरी या पदभ्रमण मोहिमीमध्ये सहभाग घेवून त्याने ही कामगिरी यशस्वी केली. अर्चितला वयाच्या दुसर्‍या वर्षापासून ट्रेकिंगची आवड आहे.
आतापर्यंत त्याने राजगड, रायगड, रांगणा, पन्हाळा – पावनखिंड, या सारख्या महाराष्ट्रातील ( Maharashtra)बर्‍याच गडकोट मोहीमा पूर्ण केल्या आहेत. यासाठी त्याला त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक, तसेच मित्रमंडळीचे सहकार्य असते, त्यासाठी तो नेहमी सराव करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *