नुकतंच लग्न झालेलं ‘हे’ मराठमोळं कपल गोव्यात साजरा करतंय हनिमून

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सुयश टिळक आणि आयुषी भावे २१ ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले.त्यांच्या लग्नातील फोटो(Photo) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.आता लग्नानंतर हे कपल हनिमूनसाठी गोव्याला(Goa) गेले आहे.

सुयश आणि आयुषीने गोव्यात फिरतानाचे फोटो(Photo) सोशल मीडियावर शेअर केले आहेत.सुयशला फोटोग्राफीची आवड असल्याने त्याने गोव्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.या फोटोंमधील काही फोटो हे हॉटेलमधील आहेत तर काही बाहेर फिरतानाचे.त्यांनी स्विमिंगपूलमधील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.त्यांनी गोव्यातील एका कॅफेमधील फोटो देखील शेअर केला आहे.आयुषी आणि सुयश सध्या गोवा(Goa) एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे.
सुयशने गोव्याच्या(Goa) एका समुद्र किनाऱ्याचा काढलेला हा खास फोटोसध्या आयुषी आणि सुयशचे गोव्यातील हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
लग्नानंतर सुयश-आयुषी देवदर्शनाला देखील गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *