हरभजन सिंग खेळणार राजकीय ‘इनिंग’? ; विविध पक्षांची ऑफर

भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग(Harbhajan Singh) याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घाेषणा शुक्रवारी ( २४ डिसेंबर) केली. लवकरच तो राजकीय इनिंग(State ‘innings’) खेळण्याची चिन्हे आहेत. राजकारणाच्या पीचवर आता गोलंदाजी करण्याचे त्याचे मनसुबे असून कुठल्या राजकीय पक्षाकडून तो नवी इनिंग खेळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कालच हरभजन सिंग(Harbhajan Singh) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. हरभजन गेल्या काही वर्षांपासून खेळलेला नाही. तरीही तो क्रिकेटमध्ये होता. त्याने आपल्या निवृत्तीची औपचारिक घोषणा केली. हरभजनने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पंजाब काँग्रेसचे(Punjab Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांची भेट घेतली. त्यामुळे तो काँग्रेसमध्ये जाईल असे बोलले जात होते.
एका न्यूज एजन्सीशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, ‘ मी सर्व पक्षाच्या नेत्यांना ओळखतो. मी राजकारणात प्रवेश करणार असलो तर सर्वात आधी मीडियाला सांगेन. राजकारण असो अथवा अन्य कुठलाही दुसरा मार्ग मी स्वीकारला तर मी तो जाहीर करेन. पंजाबची सेवा करणे हे माझे ध्येय आहे. अद्याप मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.हरभजन सिंगने नवज्योत सिद्धूची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला विचारले असता, मला वेगवेगळ्या पक्षांतून ऑफर आहेत. मी नवज्योत सिद्धूशी क्रिकेटर म्हणून मी चर्चा केली.’ मात्र हरभजन सिंगच्या स्पष्टीकरणावर राजकीय नेत्यांचे म्हणने वेगळे आहे. आपल्या फिरकी गोलंदाजीने फलंदाजांना चकवणाऱ्या हरभजनने ‘ऑफ द फिल्ड’ बोलून गुगली टाकली आहे. पंजाब निवडणुकीच्या आधी हरभजन सिंगने क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती हा योगायोग नाही.
हरभजन सिंग याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी त्याने सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीची घोषणा केली. हरभजन यांनी २३ वर्षांत ७११ बळी टिपले. त्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, सर्वकाही संपत असते. आज मी माझ्या खेळाला रामराम करत आहे. या खेळाने मला सर्वकाही दिले आहे. मी सर्वांचा आभारी आहे, ज्यांनी २३ वर्षांचा प्रवास सुंदर आणि अविस्मरणीय(Unforgettable) केला. २००७ मध्ये टी-२० आणि २०११ मध्ये वन डे वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकला. या संघात हरभजनचा समावेश हाेता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *