टीम इंडियात आला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही टाकलं मागे

(sports news) रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा सिक्सर किंग आहे, यात शंका नाही. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. आता या बाबतीत युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत त्याला टीम इंडियातून तगडी स्पर्धा देत आहे. 2021 मध्ये या बाबतीत डावखुऱ्या स्टार भारतीय फलंदाजाने रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.

ऋषभ पंतने या वर्षात भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 36 षटकार ठोकले असून भारतीय फलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे. पंतने यावर्षी कसोटीत सर्वाधिक 15 षटकार आणि एकदिवसीय सामन्यात 11 षटकार लगावले आहेत. यासोबतच त्याने टी-20 इंटरनॅशनलमध्ये 10 षटकार ठोकले असून तो टी-20 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तर रोहित शर्माने या वर्षात केवळ 34 षटकार ठोकले असून पंतनंतर तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. रोहितने T20I मध्ये सर्वाधिक 23 षटकार लगावले आहेत, तर त्याने कसोटीत 11 षटकार ठोकले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहितने वनडेमध्ये एकही षटकार लगावलेला नाही नाही. (sports news)

भारतासाठी यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्येदेखील पंत आणि रोहित यांचा समावेश आहे. रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये 35 डावांमध्ये एकूण 1420 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 43 आहे. वर्षभरात त्याने 2 शतके आणि 9 अर्धशतके लगावली आहेत. त्याच वेळी, पंतने 31 डावांमध्ये 41.30 च्या सरासरीने 1074 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *