उदयनराजेंच्या ‘काय बाई सांगू, कसं गं सांगू…’ टीकेवरुन शिवेंद्रराजेंचा टोला;

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभेवरील खासदार उदयनराजे भोसले(Udayan Raje Bhosle) आणि सातारा जावळीचे भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosle)यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसतोय. नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही राजेंनी विकासकामांचा धडाका सुरु केलाय. पण या विकासकामांच्या उद्घाटनांच्या कार्यक्रमांमधूनही दोन्ही नेते एकमेकांवर टीका टीप्पणी करताना दिसत आहेत. शुक्रवारीच उदयनराजे भोसलेंनी ‘काय बाई सांगू, कसं गं सांगू…’ ‘काय बाई सांगू कसं गं सांगू’ गाणं म्हणत शिवेंद्रराजेंवर निशाणा साधल्यानंतर आज शिवेंद्रराजेंनी या टीकेला उत्तर दिलंय.
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्याकडून एकमेकांवर नारळफोड्या आणि घरफोड्या अश्यापद्धतीच्या टीका केल्या जात आहेत. या टीका टीप्पण्यांमुळे सातारा पालिकेच्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. कालच सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी उदयराजेंनी शिवेंद्रराजेंना चर्चेसाठी या असं आवाहन केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी गाण्याच्या माध्यमातून शिवेंद्रराजेंवर निशाणा साधला. “काय बाई सांगू? कसं गं सांगू मलाच माझी वाटे लाज. काहीतरी मला झालंय आज”, अशा ओळी म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला तेव्हा सभागृहामध्ये एकच हशा पिकला.
काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर निशाणा साधताना उदयनराजेंना नारळफोड्या गँग असं म्हटलं होतं. उदयनराजेंच्या हस्ते सातऱ्यामध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनांच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंनी हा टोला लगावलेला. यावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना फटकारलं होतं. आम्ही नारळ वाढवून लोकांसाठी चांगली काम करतोय मात्र तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केलंय, असा टोला उदयनराजेंनी लागवला.सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना चर्चेला येण्याचं आवाहन केलंय. आमचा नारळफोडी गँग असा उल्लेख केला असला तरी आम्ही कामं केली असल्याने नारळ फोडतोय. आम्ही एखाद्याचं संपूर्ण घरदार उद्धवस्त केलेलं नाही, असा चिमटा काढतानाच चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे कधीही तयार आहेत, असंही भाजपा खासदार म्हणालेत. मात्र पुढच्याच ओळीत त्यांनी चर्चेला येण्याचं धाडस पाहिजे असं म्हणत त्यांनी शिवेंद्रराजेंना आव्हान दिलंय. काही कारण नसताना लहान मुलाप्रमाणे शिवेंद्रराजेंकडून वैयक्तिक टीका केली जात असल्याचंही उदयनराजे यावेळी म्हणाले.
सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे उदयनराजे यांनी भूमिपूजन केले यावेळी उदयनराजे भावुक होत आय लव सातारकर असे उदगार काढले होते. यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सडकून टीका केली आहे. “या इमारतीचा प्रस्ताव नाही, बजेट नसून तांत्रिक मान्यता नसल्याचे सांगत नारळ फोडून, गाणी गाऊन लोक मोकळी झाली. काय बाई सांगू वगैरे गाणी गाण्यापेक्षा तुम्हाला नक्की लाज कशाची वाटते हे सातरकरांना कळू दे. नेहमीच्या टॅकटीक्स झाल्यात या. दहा मिनिटं रडायचं आणि जाता पप्पी घ्यायची हे नेहमीचं झालं आहे. या सर्व मुद्द्यावरुन टीका होऊ लगालीय. तुम्ही कामांचं बोला. पाच वर्ष तुम्हाला सत्ता दिली तुम्ही भ्रष्टाचारमुक्त पालिका करणार होता मात्र हे कुठं गेलं?,” असा सवाल शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर टीका करताना उपस्थित केला.“सध्या वापरण्यात येणाऱ्या या टॅकटीक्स लक्षात घ्या. गळ्यात पडायचं, पप्प्या घ्यायचं हे जे प्रेम आहे ते मनापासून नाहीय. हे मतांपुरतंचं प्रेम आहे. हे प्रेम सातारकरांनी ओळखलं पाहिजे,” असंही शिवेंद्रराजे भाषणात म्हणाले.उदयनराजेंनी केलेल्या या टीकेला शिवेंद्रराजेंनी आज उत्तर दिलंय. शिवेंद्रराजेंच्या हस्ते आज विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आले. साताऱ्यातील रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी शिवेंद्रराजेंनी चक्क जेसीबी चालवला. त्यांनी जेसेबीचे स्टेरिंग हातात घेत रस्त्याचे भूमिपूजन केले यावेळी अनेक समर्थक आणि नागरिक उपस्थित होते. उदयनराजे आपल्या हटके स्टाईलने नेहमीच चर्चेत असतात. चाहत्यांच्या आग्रहास्तव शहरातून दुचाकी चालवणे सुसाट जिप्सी राईडचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. याचीच आठवण आज शिवेंद्रराजेंना जेसीबीचे स्टेरिंग हाती घेऊन तो चालवत पाहून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *