महाराष्ट्रात कधी लागू होणार Lockdown?,आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या एका दिवसात कोरोनाचे 1485 रुग्ण आढळले आहेत. नवीन वर्षापूर्वी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकार (Government)चिंतेत आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोना व्हायरसने वेग पकडल्यानंतर आता लॉकडाऊनची चर्चाही जोर धरू लागली आहे. शनिवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात लॉकडाऊन कधीलागू होणार आहे.

कोविडचा नवीन व्हेरिएंट जगभरातील देशांसाठी अडचणीचा ठरला आहे. ओमायक्रॉनचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसू लागला. गेल्या एका दिवसात राज्यात 20 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शनिवारी सांगितले की, वैद्यकीय ऑक्सिजनची दररोजची मागणी 800 मेट्रिक टनपर्यंत असेल तेव्हाच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केला जाईल.

एक दिवस आधी राज्य सरकारनं (Government) कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ लक्षात घेऊन रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी घातली आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लोकांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले.टोपे (Rajesh Tope) यांनी जालन्यात पत्रकारांना सांगितले की, ओमायक्रॉनची (omicron virus) प्रकरणे “झपाट्याने” वाढत आहेत, मात्र सर्वसाधारणपणे अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात ( ICU) दाखल करण्याची गरज नाही किंवा त्यांना पूरक ऑक्सिजनची गरज नाही. ते म्हणाले, ‘वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी जेव्हा 800 मेट्रिक टन वाढेल तेव्हाच राज्यव्यापी लॉकडाऊन होईल’.

राजेश टोपेंनी (Rajesh Tope)  राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या वापराच्या सध्याच्या दराचा उल्लेख केला नाही. ते म्हणाले, लोकांना अधिक निर्बंधांचा सामना करावा लागू नये अशी आमची इच्छा आहे, म्हणून मी लोकांना आवाहन करत आहे की त्यांनी कोविड-योग्य वर्तनाचे पालन करावे. मास्क घालणे खूप महत्वाचे आहे.
शाळा पुन्हा बंद होणार का?

राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आता शाळा पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याच दरम्यान आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक भीती व्यक्त केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, शाळा नियमित सुरू राहतील मात्र निर्बंध कटाक्षाने पाळावे. आज ओमयक्रोन आकडा शंभरीत असताना डबल ने वाढतोय, जर हजारावर आकडा जाऊन दुपटीने अशीच वाढ झाल्यास परिस्थिती चिंताजनक होईल. ओमायक्रोनचा (omicron virus) वाढता प्रभाव आणि शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाची गरज असल्याचंही राजेश टोपे म्हणाले. लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेऊन समुपदेशनाने मन परिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीसाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *