विशाल निकमचं Double Celebration, बिग बॉससोबत ‘या’ गोष्टीत ही मारली बाजी

बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन नुकताच संपला आहे. या खेळात प्रेक्षकांच्या (audience) लाडक्या विशाल निकमने बाजी मारली आहे. त्याने अनलॉक मनोरंजन करत सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

विशालने बिग बॉसची ट्रॉफीसह 20 लाखांची रोख रक्कम मिळवली आहे. पण आता विजेतेपद पटकावल्यानंतर आणखी एका गोष्टीत विशालने बाजी मारली आहे. त्याने इंस्टाग्रामवर आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

बिग बॉसच्या घरात जाण्याआधी विशालचे फॉलोवर्स अगदी कमी होते, आता त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात त्याला फॉलो करायला सुरुवात केली आहे. त्याने 1 लाख 22 हजार फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे.

सोबत त्याने विजेतेपद पटकावल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. ट्रॉफी हातात घेतल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशालने बिग बॉस आधी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. पण बिग बॉसचा मंच हा त्याच्यासाठी प्रेक्षकांच्या (audience) मनात आणि घराघरात पोहोचण्यासाठी सर्वात मोठा मार्ग ठरला आहे.

बिग बॉसच्या घरात प्रवेश करत असताना दिसलेला विशाल हा त्याने शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह परदेशातूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. महेश मांजरेकर यांनी देखील विनरचे नाव घोषित करत विशालाचे कौतुक केले. ग्रॅण्ड फिनालेच्या आधीही महेश मांजरेकर यांनी विशालला इतर स्पर्धकांपेक्षा उत्तम खेळत असल्याचं सांगितलं होतं. सोशल मीडियावर सध्या विशालचीच चर्चा पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *