केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या मुलीचा झाला साखरपुडा; जावई कोण?

एकेकाळी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत सुनेची भूमिका साकारणाऱ्या स्मृती आता खरोखरच्या आयुष्यात सासू झाल्या आहेत.
स्मृती इराणी(Smriti Irani) यांची मुलगी(Daughter) शनैल इराणीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.याबाबत एक पोस्ट शेअर(Post Share) करत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहेस्मृती इराणी यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शनैल इराणी आणि अर्जून भल्लाचा एक फोटो शेअर केला आहेत. यात ते दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहे. तुम्हाला माहित नसेल की शनैल ही स्मृती इराणी यांची सावत्र मुलगी आहे. शनैल ही मोना इराणी यांची मुलगी आहे.
शनैलचे तिच्या दोन्ही भावंडांसोबत चांगले ट्यूनिंग आहे. तर, स्मृती इराणी यांचेही शेनेलची आई मोनासोबत चांगले संबंध आहेत.शनैलचे नाव शाहरुख खानने ठेवले होते. शाहरुख खान आणि शनैलचे वडील झुबिन इराणी बालपणीचे मित्र आहेत.
शनैल वकील आहे. तिने मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून लॉ ची पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटरमधून एलएलएम पदवी पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *