दुसरा आणि बूस्टर डोसमध्ये किती कालावधीचं अंतर पाहिजे?

देशात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढलेत. संपूर्ण देशात आता 500हून जास्त ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. मात्र आता प्रश्न असा आहे की, लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामध्ये किती कालावधीचं अंतर असलं पाहिजे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असू शकतं. दुसरा डोस आणि बुस्टर डोसमधील अंतर ठरवण्याबाबत लवकरच राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार संस्थेमार्फत चर्चा केली जाणार असल्याची देखील माहिती आहे.

भारताच्या लसीकरण कार्यक्रमात सध्या वापरल्या जाणार्‍या Covashield आणि Covaxin या लसींच्या अंतराचे तपशीलाची चर्चा केली जात आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला. फ्रंटलाईन वर्कर्स आणि जेष्ठ व्यक्तींना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही पंतप्रधानांनी घोषणा केली आहे.

60 वर्षांवरील वृद्ध व्यक्ती ज्या इतर गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, ते बूस्टर डोस घेऊ शकतात. 10 जानेवारीपासून हा बूस्टर(Booster) डोस देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *