सेप्टिक टँकमध्ये पडून घर मालकासह दोघांचा मृत्यू

अहमदनगर तालुक्यातील(Taluka) निंबळक शिवारातील एका घरात सेप्टिक टँक(Septic tank) स्वच्छ करताना अपघात होऊन घर मालकासह एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शौचालयाच्या सेप्टिक टँकमधील मैला काढण्याचे काम सुरू असताना टँकमध्ये पडून घर मालकासह एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला आहे. घर मालक साहेबराव भागाजी खेसे (वय ५० रा. निंबळक ता. नगर) व कामगार अरुण श्रीधर साठे (वय ३८ रा. नागापूर) असे मृतांची नावे आहेत. कामगार अशोक साठे (रा. नागापूर) जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगर तालुक्यातील निंबळक शिवारात रविवारी(Sunday) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस(MIDC Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निंबळकमधील पांडुरंगनगर परिसरात साहेबराव खेसे यांचे घर आहे. त्यांच्या घरातील सेप्टिक टँक भरल्यामुळे त्यातील मैला काढण्यासाठी त्यांनी रविवारी दुपारी दोन कामगारांना बोलविले होते. टँकमधील मैला काढत असताना एक कामगार टँकमध्ये पडले. त्यापाठोपाठ दुसरा कामगारही टँकमध्ये पडला. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना मालक साहेबराव टँकमध्ये पडले. त्यातील एका कामगाराला बाहेर काढण्यात यश आले. मालक साहेबराव व कामगार अरुण साठे यांचा यामध्ये मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळल्यानंतर सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *