चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही; शरद पवार यांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार व्यवस्थित सुरू असून ते स्थिर सरकार आहे. यामुळे जे अस्वस्थ आहेत तेच राष्ट्रपती राजवटीची विधाने करत आहेत. त्यांची दखल महाराष्ट्रात घेतली जात नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (Congress President) आणि खा. शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उद्घाटन कार्यक्रमासाठी ते सातारा दौर्‍यावर आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आ. चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होईल असे विधान केले होते.त्यानंतर पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकारला मोठ्या संख्येने आमदारांचा पाठिंबा असल्याने सरकार स्थिर आहे.

सरकार स्थिर असल्यानेच भाजप व चंद्रकांत पाटलांकडून राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. सरकारला धोका नसल्यानेच ते अस्वस्थ झाले असून त्यामुळेच ते अशा प्रकारची विधाने करत आहेत. यापूर्वीही त्यांनी अशी विधाने केली आहेत. मात्र, त्यांच्या विधानाची दखल महाराष्ट्रात घेतली जात नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतच्या कारणांची जी यादी त्यांनी सांगितली आहे ती त्यांनाच विचारा, असा टोलाही खा. शरद पवार यांनी आ. चंद्रकांत पाटील यांना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *