सनी लिओनीला मध्य प्रदेशच्या गृहमंत्री मिश्रांनी दिला तीन दिवसांचे अल्टीमेटम
१९६० मधील कोहिनूर चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका’ ( Madhuban mein Radhika ) गाणं होते. या गाण्याचा रिमेक अभिनेत्री सनी लिओनी आणि संगीतकार शारिब तोशी यांनी केला आहे. आता हा म्युझिक व्हिडीओ वादाच्या भोवर्यात सापडला आहे. यावर मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सनी लिओनी हिने तीन दिवसांमध्ये वादग्रस्त ‘मधुबन में राधिका नाचे’ ( Madhuban mein Radhika ) हा म्युझिक व्हिडीओ हटवावे, तसेच माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ट्विट केले आहे की, काही लोक सातत्याने हिंदू धर्मांच्या भावना दुखावत आहेत. हा व्हिडीओ ही असाच प्रकार आहे. भारतात राधेची पूजा केली जाते. साकिब तोशी यांनी आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशी गाण्याची निर्मिती करु नये. सनी लिओनी आणि शारिब तोशी यांनी तीन दिवसांमध्ये हा व्हिडीओ हटवून माफी मागावी. अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करु.
व्हिडीओमधील गाणं कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. तर कोरियोग्राफ गणेश आचार्य ( Madhuban mein Radhika ) यांनी केले आहे. २२ डिसेंबरला हा व्हिडीओ यू ट्यूबवर रिलाज झाला. याला काही दिवसांतच ९ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. काही नेटकर्यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला. यानंतर याची चर्चा सुरु झाली. मथुरेतील काही पुजार्यांनीही या गाण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सरकारने याविरोधात कारवाई केली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही पुजार्यांनी दिला आहे.