महाविद्यालयात Corona चा विस्फोट; विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
पुण्यातून (Pune) एक मोठी बातमी समोर येतेय. पुण्यातील नामांकित महाविद्यालयात कोरोनाचा (Corona Virus) शिरकाव झाला आहे. कोथरुड (Kothrud) येथील एमआयटीच्या (MIT) मॅकॅनिकल इंजिनिअरिंग (mechanical engineering) च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काल अहमदनगरमध्ये (Ahmednagar)52 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.
पुण्यात सध्या कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. कोरोनाबधित आढळून आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते. एका बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या 25 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. त्या 25 पैकी 13 पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.
अहमदनगरमध्ये Corona Virus चा उद्रेक
काल अहमदनगरमध्ये (Ahmednagar) 52 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात आणखी 52 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचे (Corona Virus) निदान झाले. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आज दुपारी विद्यालयाला भेट दिली आहे.
तीन दिवसांपूर्वी या विद्यालयात 16 विद्यार्थी, दोन शिक्षक, सफाई कर्मचारी, असे 19 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यानंतर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाळेतील 385 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आणखी 52 विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाची निदान झाले.
जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. शाळेत 5वी ते 12वी पर्यंत वर्ग असून 400 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याचंही सांगण्यात येत आहे.