पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडणार?

पाच राज्‍यांमधील विधानसभा(Assembly) निवडणुका या तीन महिन्‍यांसाठी लांबणीवर टाकल्‍या जातील, असे वृत्त एका इंग्रजी वेबसाइईटने(Website) दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या आजच्‍या बैठकीत यासंदर्भातील निर्णय होण्‍याची शक्‍यताही वर्तविण्‍यात येत आहे.

२०२२मध्‍ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांवर ओमायक्रॉन संकटाचे सावट आहे. कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेमध्‍येही काही राज्‍यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्‍या होत्‍या.
कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉन संसंर्गामुळे गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज निवडणूक आयोग महत्त्‍वपूर्ण बैठक घेणार आहे. या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील निर्णय होईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्‍य सचिव राजेश भूषण यांचीही प्रमुख उपस्‍थिती असणार आहे. यावेळी कोरोनाच्‍या तिसर्‍या लाटेसंदर्भातही विचार होईल. पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुका या तीन महिन्‍यांसाठी लांबणीवर टाकल्‍या जातील, असे मानले जात आहे.
कोरोनाचा धोका अद्‍याप टळलेला नाही, असे संशोधक वारंवार स्‍पष्‍ट करत आहेत. मे २०२१मध्‍ये कोरोनाची दुसरी लाट असताना पश्‍चिम बंगालमध्‍ये विधानसभा निवडणूक झाली होती. यावर अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली होती. त्‍यामुळे पाच राज्‍यांतील आरोग्‍य परिस्‍थितीचा आढावा घेतल्‍यानंतर निवडणूक जाहीर केली जाईल, असेही या वृत्तात म्‍हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *