सांगली शहरात मार्केट यार्डात एकच खळबळ

(local news) सांगली शहरातील मार्केट यार्डात गवा आल्याने खळबळ उडाली आहे. पूर्ण वाढ झालेला हा गवा शहरात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेट्स लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात कोल्हापूर शहरातील रहिवासी भागात गवा आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर काही लोक जखमीही झाले होते. वनविभागाने नागरी वस्तीतून गव्याला बाहेर काढण्यासाठी मोहिम सुरू केली होती. (local news)