राज्यात मोठा घोटाळा उघड; कोट्यवधींची लूट
राज्यात परीक्षा भरती प्रकरणी अनेक घोटाळे (scam) उघडकीस येत असताना आता कृषी विभागातही 50 कोटींचा घोटाळा झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांनी 50 कोटींचा घोटाळा केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
नाशिकच्या पेठ तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 147 शेतकऱ्यांची फसवणूक (scam) केली आहे. खोट्या निविदा काढून सरकारी अधिकाऱ्यांनी सहा वर्षात सरकारची 50 कोटी 72 हजारांची लूट केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या प्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका ट्रॅक्टरचालक कंत्राटदार शेतक-यानं न्यायालयात धाव घेतल्यानंतर या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेत.