समंथाचा आयटम साँग शुटींगपूर्वीचा तो व्हिडीओ व्हायरल

(entertenment news) साऊथचा स्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तीनशे कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या या चित्रपटातील साऊथ सेन्सेशन समंथा रुथ प्रभूचे आयटम साँगही खूप पसंत केले जात आहे. या गाण्यातील अभिनेत्रीच्या किलर मूव्ह्सने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. सामंथाने केवळ तिच्या बोल्ड अदांनीच तिच्या चाहत्यांना खूश केले नाही, तर या गाण्यातील स्टेप्स आणि मुव्हस शिकण्यासाठी तिने खूप मेहनत देखील घेतली आहे.

दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनच्या रफ अँड टफ स्टाईलवर चाहते खूप प्रेम करत आहेत, तर अभिनेत्री सामंथाच्या ‘ओ अंतवा’ या आयटम साँगचीही जोरदार चर्चा होत आहे. गाण्यातील अभिनेत्रीच्या सेक्सी मूव्ह्स आपल्याला पाहायला तर सोप्या वाटतात परंतु, त्या तितक्या सोप्या नाहीत, या गाण्यासाठी समंथाला इतकी मेहनत घ्यावी लागली की तिला याच्या रिहर्सलच्या वेळी रडण्याची वेळ आली.

वास्तविक, या गाण्याच्या रिहर्सल BTS (बिहाइंड द सीन) चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री आपला जीव ओतुन नाचताना दिसत आहे, तसेच ‘हे लोक मला मारुन टाकत आहेत’ असेही ती तिच्या कोरिओग्राफरला सांगत आहे. (entertenment news)

पुढे सामंथा म्हणाली पाहा इकडे माझ्या इतका कोणालाच घाम येत नाही. तिने हे सर्व गमतीने सांगितले असले तरी या गाण्यासाठी ती किती मेहनत घेत आहे हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा 2021 सालातील सर्वात मोठा भारतीय चित्रपट ठरला आहे.

आयटम साँगवर सामंथा ट्रोल

पुष्पा चित्रपटातील अभिनेत्रीचा आयटम नंबर चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतानाच, एका विशिष्ट प्रेक्षक वर्गाला तिची ही बोल्ड शैली आवडली नाही. अभिनेत्रीवर निशाणा साधत काहींनी तिला घटस्फोटित सेकंड हँड आयटम म्हटले. इतकेच नाही तर एका युजरने समांथावर माजी पती नागा चैतन्यकडून 50 कोटी रुपये लुटल्याचा आरोपही केला आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असते. अलीकडेच, नवीन वर्षाच्या सुरुवातीला, तिने इंस्टाग्रामवर प्रिंटेड मोनोकिनीत एक सुंदर चित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये सामंथा वाहत्या पाण्यात खडकावर बसून हसताना दिसत आहे. सिल्व्हर हार्ट कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने GoaYouTube चा हॅशटॅग जोडला आहे. या फोटोला 11 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *