महाराष्ट्रात कधी लागणार Lockdown? कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी दिली संपूर्ण माहिती

राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे (Patient) वाढते प्रमाण आधीच्या लाटांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत तीनपटीने वाढताना दिसत आहे. त्यातच राज्यात कोरोनाची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन लागणार का असा प्रश्न पडला आहे. यावर महाराष्ट्रात कोविड टास्क फोर्सनी राज्यातल्या लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.

जोपर्यंत राज्यातील परिस्थिती गंभीर होत नाही आणि कोविड-19 चे अनेक गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन होण्याची शक्यता नाही आहे. महाराष्ट्रातील कोविड टास्क फोर्सचे सल्लागार सदस्य आणि मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या समन्वय समितीचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी यांनी ही माहिती दिली आहे.

भन्साळी म्हणाले की, लॉकडाऊन होणार नाही.जेव्हा लोक गंभीर स्थितीत रूग्णालयात येऊ लागतील किंवा दीर्घकाळ रूग्णालयात गंभीर अवस्थेत असतील तेव्हाच लॉकडाऊन हा पर्याय असेल.भन्साळी म्हणाले, रुग्णालयात दाखल करणं ही समस्या नाही कारण ‘बहुतेक रुग्ण (Patient) (सध्याच्या लाटेत) लक्षणे नसलेले असतात आणि ते रुग्ण 2 ते 3 दिवसांत बरे होतात. मुंबईत जर 40 हजार केसेस आढळले तरी आम्ही तयार आहोत.

मुंबईत कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळतोय. विशेष म्हणजे मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णसंख्येने 15 हजारांचा टप्पा पार केला होता. पण गुरुवारी हाच आकडा थेट 20 हजारांच्या पार गेला. त्यामुळे प्रशासनासह मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे मुंबईची प्रसिद्ध झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाबाधितांचा गुरुवारचा आकडा थेट 100 च्या पार गेलेला आहे.

त्यामुळे प्रशासनापुढील मोठे आव्हानं उभी राहिली आहेत. मुंबईत गुरुवारी दिवसभरात तब्बल 20 हजार 181 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 17 हजार 154 रुग्णांमध्ये सध्यातरी कोणतेही लक्षणे दिसत नाहीयत. तर दिवसभरात 1 हजार 170 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिवसभरात चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 2 हजार 837 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे.मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर हा थेट 30 टक्क्यांवर पोहोचला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *