राजू शेट्टी तुमचे जरा चुकलेच

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या एकतर्फी विजयाने सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. या निकालाचा आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व बाजार समितीच्या निवडणुकांवर दूरगामी परिणाम होणार आहे. (Raju shetti vs Yadravkar)शिरोळमध्ये सर्व पक्षिय एकत्र येवून गणपतराव पाटील यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे जिल्हा नेतृत्वाने गणपतराव पाटील यांना अर्ज मागे घ्यावा. त्यांना स्विकृत संचालक करतो. व स्वाभिमानीच्या संदीप कारंडे यांना सत्तारूढ आघाडीतून उमेदवारी देतो. असे दोन्ही प्रस्ताव दिले होते.मात्र, शेट्टी यांच्या आग्रहास्तव यड्रावकर यांच्या विरोधात गणपतराव पाटील यांची उमेदवारी घोषित केले. त्यानंतर झालेल्या या निवडणूकीत गणपतराव पाटील यांचा पराभव झाल्याने स्विकृत पदाची संधी हुकली. त्याचबरोबर संदीप कारंडे यांनाही उमेदवारीपासून लांब रहावे लागले. त्यामुळे राजू शेट्टी तुमचे जरा चुकले असा प्रश्न तालुक्यातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.

सध्या मंत्री यड्रावकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याने हीच आघाडी येणार्‍या निवडणुकीतही राहणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सध्या तरी मंत्री यड्रावकर यांनी सर्वपक्षियांना अस्मान दाखविले आहे. निवडणुकीत प्रचारा दरम्यान चुरशीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र निकालामध्ये यड्रावकर यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे.

विधानसभेच्या निवडणूकीतही यड्रावकर यांनी अपक्ष निवडणूक जिंकली होती. आता जिल्हा बँकेतील विजयामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय पटलावर यड्रावकर यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. याचा परिणाम आगामी होणार्‍या सर्वच निवडणूकात होणार आहे. यात हे सर्व पक्षिय नेते एकत्र येवून यड्रावकर यांच्या विरोधात राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, पतसंस्था गटातून उभे राहिलेले अर्जुन आबिटकर यांना शिरोळ तालुक्याने पाठबळ दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

113 मतांपैकी अबीटकर यांना 55 तर आ. प्रकाश आवाडे यांना 51 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्व.सा.रे.पाटील हे मंत्री यड्रावकर यांना राजकीय मानसपुत्र मानत होते.

त्यामुळे यड्रावकर व सा.रे.पाटील गट हा तालुक्यातील सर्व निवडणूकीत एकत्रित येवून लढत होते.

आता मात्र, केडीसीसी निवडणूकीमुळे मंत्री यड्रावकर व गणपतराव पाटील यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याने दोन्ही गटात फुट पडली आहे.

त्यामुळे याचा परिणाम आगामी निवडणूकीत होणार असून, यापुढेही यड्रावकर व पाटील गटात संघर्ष राहणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *