हे होममेड लिप स्क्रब ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर
कॉफी-क्रीम: कॉफी आणि क्रीम मिसळून ओठांना 10 मिनिटे स्क्रब करा. यामुळे ओठांमध्ये (lips) ओलावा निर्माण होईल आणि ते मऊही राहतील.
साखर लिंबू : लिंबू साखरेत मिसळून स्क्रब केल्याने ओठांचा काळपटपणा कमी होतो. तसेच व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते.
बीट: बीटमध्ये दही आणि साखर मिसळून ओठांना स्क्रब केल्याने ते गुलाबी आणि हायड्रेटेड राहतात. तसेच ओठ मऊ राहतात.
स्ट्रॉबेरी: तांदळाचे पीठ स्ट्रॉबेरीसोबत घ्या आणि त्यात थोडा मध घाला. ते ओठांवर (lips) स्क्रब केल्याने ते बराच काळ मॉइश्चराइज राहतील
ओट्स-मध: ओट्स आणि मध स्क्रबमुळे ओठांची मृत त्वचा निघून जाते आणि मधामुळे ओलावा टिकून राहतो.