घरगुती भांडणातून पत्‍नीवर ॲसिड फेकले, प्रकृती चिंताजनक

बिहारमधील सुपौल जिल्ह्यात एका ॲसिड हल्ल्याची घटना समोर आली आहे. भांडणातून पतीने पत्नीवर ॲसिड हल्ला केला. या ॲसिड हल्ल्यात महिलेसह अन्‍य दोन व्यक्ती गंभीर जखमी आहे.. बिहार पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बिहार मधील पिपरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दाम्‍पत्‍यामध्‍ये सोमवार, १० जानेवारी रोजी भांडण झाले. यावैणी पतीने राबाथरुममध्ये ठेवलेले ॲसिड पत्नीच्या अंगावर टाकले. पत्नी मोठमोठ्याने ओरडू लागली. या महिलेचा आवाज ऐकून शेजारी राहणारी मदत करण्यासाठी आले. शेजारीची महिला आणि त्या महिलेचा मुलगाही या हल्‍ल्‍यात गंभीर जखमी झाला.डॉ. आशिष रंजन म्हणाले की, घरगुती वादातून ॲसिड हल्ल्याची घटना समोर आली आहे. जखमींमध्ये दोन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नगरच्या सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पसार झालेल्‍या पतीचा पाेलिस शाौध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *