गाेव्‍यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्‍न : शरद पवार

पाच पैकी तीन राज्‍यांमधील विधानसभा निवडणुका राष्‍ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे. गोवामध्‍ये परिवर्तनाची गरज आहे. येथील भाजप सरकार हटविण्‍याची आवश्‍यकता आहे. गोव्‍यात आमची तृणमूल आणि काँग्रेसबरोबर चर्चा सुरु आहे, अशी माहिती राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी आज माध्‍यमांशी बाेलताना दिली.पाच राज्‍यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूक राष्‍ट्रवादी काँग्रेस लढविणार आहे. उत्तर प्रदेशमधील लोकांना बदल हवा आहे. त्‍यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्‍यात परिवर्तन होईल,असा विश्‍वासही शरद पवार यांनी व्‍यक्‍त केला. उत्तर प्रदेशमध्‍ये सध्‍या बदलाची हवा आहे. त्‍यामुळे आतापासूनच भाजपचे आमदार पक्ष सोडत आहेत. आणखी १३ आमदार भाजपला सोडणार आहेत, असा दावाही त्‍यांनी यावेळी केला.गोव्‍यात आमची काँग्रेस आणि तृणमूलबरोबर चर्चा सुरु आहे. मणिपूरमध्‍ये आम्‍ही ५ जागांवर निवडणूक लढविणार आहोत. उत्तर प्रदेशमध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्रीत निवडणूक लढवतील. उत्तर प्रदेशमध्‍ये समाजवादी पार्टीच्‍या नेतृत्‍वाखालील आघाडीचे सरकार येईल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

महाराष्‍ट्रातील एसटी कर्मचारी आवाहनानंतरही संपावर ठाम आहेत. हा त्‍यांचा अधिकार आहे. एसटी विलीनीकरणाचा मुद्‍दा सध्‍या न्‍यायालयात आहे. त्‍यामुळे यावर भाष्‍य करणार नाही, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *