…….त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल – सतेज पाटील
फेब्रुवारी 2022 अखेर कोरोनाची लाट (Corona Wave)ओसरेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या(corona patient) वाढू नये यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनूसार शाळा चालकांनी थोडा संयम ठेवावा आणि 15 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा व कॉलेज बंद ठेवावीत. जी शाळा (school) बंद केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा इशारा पालकमंत्री दिला. तसेच, गायरान जमिनीत क्रीडांगण करण्यासाठी मागणी होत असल्यास त्यांना मंजूरी दिली जात आहे. सध्या आलेल्या प्रस्तावांपैकी कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर एकही प्रस्ताव प्रलंबित नाहीत. सध्या क्रिडांगणांची (play ground)मागणी वाढली आहे. 2022-23च्या अनुदानासाठी क्रिडांगण अनुदानात वाढीव मागणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
श्री पाटील म्हणाले, क्रीडा संकुलासाठी (play ground) पहिला निधी आला. त्याची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, राज्य शासनाने 25 ऐवजी 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी मार्च मध्ये यईल त्यानंतर पुढील कामे गतीने करता येतील. जिल्हा क्रिडा संकूल दहा एकरात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करुन पाठवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन प्रकल्प उभारली आहे. सध्या दवाखान्यात ऍडमिट होताना दिसत नाहीत. याचा अर्थ भविष्यात होणार नाहीत, असे नाही. याचीही तयारी केली आहे. पण जिल्ह्यात लसच कवच कुंडल आहे. हे लक्षात घेवून पहिला डोस ज्यांनी घेतलेला नाही. त्यांना लसी दिली जाणार आहे. लस घेण्याची सक्ती केली जाणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.
लस हेच कवच कुंडल
लस घेतलीच पाहिजे. लस हेच कवच कुंडल आहे. जे कोणी लस घेवू नका म्हणतात त्यांचा फारसा विचार करु नका.राज्यात ऑक्सिजनवर असणाऱ्या 98 टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसही घेतलेला नाही. त्यामुळे लसीकरणशिवाय पर्याय नसल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले.राधानगरी धरणाचा दरवाजा उघडून रहिला यामुळे जास्त नूकसान झाले नाही. पण तो दरवाजा का उघडा राहिला याचे सीसीटीव्ही फुटेज पाहून चौकशी केली जात आहे. कामात हयगय असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही श्री पाटील यांनी सांगितले.