एसटी संपामुळे नोकरी गेली तर कर्ज कसे फेडायचे?

एसटीच्या संपामुळे नोकरी गेली तर कर्ज कसे फेडायचे, या आर्थिक विवंचनेतून धनाजी मल्हारी वायंदडे (वय 38, रा. नाधवडे) या गारगोटी आगाराच्या चालकाने मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. दरम्यान, धनाजी वायदंडे यांचा मृत्यू आगारप्रमुखांनी पाठविलेल्या कारवाईच्या पत्रामुळे झाला असून आगारप्रमुखांवर कारवाई करावी, अशी मागणी एसटी कर्मचार्‍यांनी केली. यावेळी हुतात्मा चौकात एसटी कर्मचार्‍यांनी मोठी गर्दी
केली होती. दरम्यान, चालकाने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर गारगोटी आगारातील कर्मचाऱ्यांनी एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी सकाळी धनाजी वायदंडे यास गारगोटी आगाराची नोटीस मिळाली होती. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. दुपारी त्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद पत्नी अश्‍विनी वायदंडे यांनी पोलिसांत दिली आहे. गारगोटी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. धनाजी यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच एसटी कर्मचार्‍यांनी गारगोटी रूग्णालय, हुतात्मा चौकात मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *