दानोळीतील येथील तब्बल 14 फूट मृतमगर नदीपात्रातून काढण्यात वनविभाग व प्राणीमात्रांना यश

दानोळी येथील वारणा नदीत सोमवार दि.10 रोजी तरुणांना दिसलेल्या मृत मगरीचा शोध वन विभागासह ग्रामस्थांनी आज घेतला. तब्बल चौदा फूट लांबीची पूर्ण वाढ झालेली मग दानोळी पान वाट्या पासून 200 मीटर अंतरावर तांबोळी यांच्या वनात किनाऱ्याला आढळली वनविभागाकडून पंचनामा व शवविच्छेदन करून त्याच ठिकाणी तिला पुरले.
काल दानोळी येथे पोहण्यास गेलेल्या तरुणांना मृत मगर वाहत गेल्याचे दिसले होते.
रात्री पत्रकार युवराज पाटील यांनी हातकंगले विभागाचे वनपाल आर. के. देसा यांना फोन करून कळवले. त्यानुसार सकाळी हातकणंगले विभागाचे वनपाल आर. के. देसा यांनी सुहेल नदाफ व इर्शाद नदाफ यांच्यासोबत शोध सुरू केला. पानवठ्यापासून पुढे काही अंतरावर तब्बल चौदा फूट लांबीची व पूर्ण वाढ झालेली मगर मृतावस्थेत आढळली.
ग्रामस्थांच्या मदतीने मगर पात्राबाहेर काढली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र देशमुख यांनी शवविच्छेदन केले. मगर सडलेल्या अवस्थेत होती.
वनपाल आर के. देसा, वनरक्षक एस .एस. शिरोळकर, म. द. नवाळी, मोहन देसाई, वन सेवक लहू भंडारी, हरी दिलीप पाटील, भगवान भंडारी, यांच्यासह उपसरपंच सुनील शिंदे,तलाठी महेश नागरगोजे, ग्रामसेवक के.आर बागुल, पोलीस पाटील प्रशांत नेजकर, कोतवाल अकबर मुलानी, संजय परमाप्पा, उमेश केकले यांच्यासह ॲनिमल सहारा फाऊंडेशनचे हनमंत न्हावी, विजय पाटील, अक्षय मगदूम, सागर पाटील, मालोजी माने, यांचेही सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *