बारा वर्षांच्या मुलीने बॉक्सिंग पंच मारून पाडले झाड

रशियातील अवघ्या बारा वर्षांची एक मुलगी सध्या इंटरनेटवर सर्वात ‘स्ट्राँग गर्ल’ म्हणून प्रसिद्धी मिळवत आहे. या मुलीचे नाव आहे इव्हनिका सादवकास. या मुलीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यामध्ये ती आपले अफलातून बॉक्सिंग (Boxing) कौशल्य दाखवत जोरदार पंच मारून एक झाड पाडून दाखवत असताना दिसते.या मुलीने अगदी लहानपणापासूनच बॉक्सिंगचा(Boxing)सराव केलेला आहे. तिचे वडील रूस्ट्रम हे स्वतः बॉक्सिंग प्रशिक्षक आहेत व त्यांनी तिला या खेळाचे बाळकडू पाजलेले आहे. आता ती लहान वयातच इतकी कुशल बॉक्सर बनली आहे की तिच्यासमोर झाडही टिकू शकत नाही.या व्हिडीओमध्ये ती झाडाला ठोसे मारत असताना दिसते. आधी ती वेगवान व ताकदीच्या ठोशांनी झाडाला कमकुवत करते आणि नंतर हळूहळू हे झाड कोसळते असे या व्हिडीओमधून दिसून येते. तिच्या सात भावंडांनाही बॉक्सिंगची आवड आहे.तिची आई आनियादेखील एक उत्तम जिम्नॅस्ट होती. घरात असे खेळाला पोषक वातावरण असल्याने इव्हनिकाने बॉक्सिंगमध्ये चांगलीच प्रगती केली आहे. तिने अवघ्या चौथ्या वर्षापासून या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. एका मिनिटात 65 पंच मारण्याचा विश्‍वविक्रमही तिच्या नावावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *