भारतीय लष्कराचा नवा गणवेश आहे खास

भारतीय लष्कराच्या (Indian Army) वर्दीचं डिझाइन आता बदलण्यात आलं आहे. हवामानापासून संरक्षण आणि सैनिकांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर योग्य असा पोशाख तयार करणात आला आहे. १५ जानेवारीला याचा पहिला लूक आर्मी डे परेडमध्ये (Army Day Parade) बघायला मिळेल. आर्मी डे परेड यावेळी पहिल्यांदा लष्कराच्या वेगवेगळ्या काळातील युनिफॉर्म आणि शस्त्रांनुसार होणार आहे. प्रजासत्ताक दिनालासुद्धा (Republic Day) होणाऱ्या परेडमध्ये लष्कराचे ट्रूप हे वेगवेगळ्या युनिफॉर्मनुसार असणार आहेत.परेडमध्ये एक ग्रुप हा भारतात स्वातंत्र्याच्या आधी असणाऱ्या पोशाखात दिसेल. तसंच त्यांच्याकडे असणारी शस्त्रेही तेव्हाची असणार आहेत. तर एक ग्रूप हा १९६२ च्या काळातील पोशाखात असेल. याशिवाय १९७१ नंतरचा पोशाख आणि ९० च्या दशकात करण्यात आलेल्या बदलानुसार नव्या पोशाखातील ग्रूप असणार आहे.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने १५ पॅटर्न, ८ डिझाइन आणि चार फॅब्रिक्सच्या पर्यायातून नवा पॅटर्न असलेला हा पोशाख तयार करण्यात आला आहे. पोशाखासाठी वापरण्यात येणाऱ्या कापडमध्ये ७० टक्के कापूस आणि ३० टक्के पॉलिस्टर असणार आहे. नवीन गवेगवेगळ्या ऋतुंचा विचार करून पोशाख तयार करण्यात आला आहे. उन्हाळ्यासह हिवाळ्यातही यामुळे संरक्षण होईल, तसंच हा टिकाऊ असेल. हिरवट आणि मातीसारख्या रंगात पोशाख आहे. जवानांना ज्या क्षेत्रात तैनात करण्यात येतं तो भाग, तिथलं हवामान यांसारख्या गोष्टींचा विचार करून याचं डिझाइन करण्यात आलं आहे. जगातील काही देशांच्या लष्करी पोशाखावर सविस्तर चर्चा आणि विश्लेषण केल्यानंतर या पोशाखाची निवड करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराचा नवा पोशाख हा लिट्टेच्या गणवेशासारखा असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. यावर भारतीय लष्करानेच खुलासा करत दोन्ही पोशाखात फरक असल्याचं सांगितलं. तसंच दोन्हीमध्ये साम्य दिसावे यासाठी लष्कराच्या पोशाखाच्या फोटोशी छेडछाड केली आहे.णवेशासाठीचं फॅब्रिक वजनाने हलकं असेल आणि ते लवकर कोरडंही होण्यास मदत होईल. मोहिमेदरम्यान सैनिकांना ते आरामदायी असणार आहे.