दिल्लीत बॉम्ब तर पंजाबमध्ये RDX सापडल्यानं खळबळ

प्रजासत्ताक दिनापूर्वी (Republic Day) दिल्लीत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील गाझीपूर (IED recovery at Ghazipur Flower Market) परिसरातील फ्लॉवर मार्केटमध्ये सापडलेल्या बेवारस बॅग आढळून आल्यानंतर भाजी मंडईजवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी एक्सप्लोजिव्ह कायद्याअंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Delhi Police Special Cell under provisions of the Explosive Act)बेवारस बॅगची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक पथक (Bomb Squad Team) आणि एनएसजीची (NSG Team) टीमही घटनास्थळी जाखल झाली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सकाळी 10.50 वाजता एका पीसीआर कॉलवर गाझीपूर फूल मंडीजवळ बॉम्ब असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर खबरदारी म्हणून बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील अमृतसरमध्ये 4-5 किलो आरडीएक्स सापडले आहे. यानंतर स्पेशल टास्क फोर्सने परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील गुरुदासपूरमध्येही आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी, डिसेंबरमध्येच लुधियाना येथील न्यायालय संकुलात स्फोट झाल्याची घटना घडली होती. पंजाबमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *