सामूहिक बलात्कार, जंगलात नेऊन गाठला विकृतीचा कळस

(crime news) नातेवाईकाचे हातपाय बांधून तीन जणांनी एका विवाहितेवर सामूहिक अत्याचार (Married woman gang rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला जंगलात घेऊन जात तिच्यासोबत विकृतीचा कळस गाठला आहे. याठिकाणी तीन जणांनी पीडित महिलेवर आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार (3 men raped married woman in forest) केला आहे. यावेळी आरोपींनी पीडित महिलेच्या नातेवाईकाला मारहाण (accused beat relative) देखील केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत दोन नराधम आरोपींच्या मुसक्या आवळल्या (2 accused arrested) आहेत. अन्य एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) सोनभद्र (Sonbhadra) याठिकाणी घडली आहे. तर पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासोबत घरी परतत असताना, तीन जणांनी त्यांची अडवणूक करून हा धक्कादायक प्रकार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या एका नातेवाईकासोबत सोनभद्रच्या घोरावल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलातून दुचाकीने आपल्या घरी जात होत्या. दरम्यान तीन जणांची त्यांच्यावर नजर पडली आहे.

आरोपींनी पीडित महिलेचा आणि त्यांच्या नातेवाईकाचा गुपचूप पाठलाग केल्या. त्यानंतर एका निर्जनस्थळी पोहोचल्यानंतर आरोपींनी दोघांना अडवलं आणि पीडितेसोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. यावेळी नातेवाईकानं विरोध केला असता, आरोपींनी नातेवाईकाला बेदम मारहाण केली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी नातेवाईकाचे हातपाय बांधले. त्यानंतर पीडित विवाहितेला घनदाट जंगलात घेऊन जात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. (crime news)

हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच, पोलिसांनी पीडितेनं दिलेल्या फिर्यादीच्या आधारे तातडीने तपासाची चक्रं फिरवली. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अन्य एक आरोपी फरार झाला आहे. संबंधित आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *