राजकारण पेटलं, केंद्राने राज्याचा दावा फेटाळला
राज्यांना कोरोना (Coronavirus) लसीचा (Vaccination) योग्य पुरवठा करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. 10 दिवस पुरेल इतका साठा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. कोव्हॅक्सिन लसींचा दहा दिवस पुरेल एवढा साठा आहे, असे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.
24 लाखांपेक्षा जास्त लसीचे डोस आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच राज्य सरकारचा लस तुटवड्याचा दावा फेटाळून लावला आहे. महाराष्ट्र राज्याला 90 लाख लसीच्या डोसची गरज आहे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत 90 लाख लसी डोसची मागणी केली होती. जर पुरवठा झाला नाही तर लसीकरणाचे काम थांबेल, असे संकेत राजेश टोपे यांनी यावेळी दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आहे असून टोपे यांना दावा केंद्राने फेटाळला आहे. त्यामुळे लसीवरुन राजकारण आता पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्ली आणि मुंबई तसेच कोलकाता या तीन मोठ्या शहरांतील कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्येत शुक्रवारी किंचित घट आली आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील बाधितांची संख्या वाढली आहे. देशात 24 तासांतील रुग्णसंख्या 2 लाख 64 हजारांपेक्षा जास्त वाढली आहे. राज्यात मात्र गुरुवारच्या तुलनेत कमी रुग्ण आढळले.
गेल्या आठवडाभरात मुंबईतील रुग्णसंख्येत चढउतार सुरु असून शुक्रवारी 11 हजार 317 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दैनंदिन रुग्णसंख्येच्या दुप्पट म्हणजेच 22 हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. मृतांची संख्या मात्र वाढली असून शुक्रवारी 9 रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 800 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले तर 88 रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला.