नितीन गडकरींनी घेतला मोठा निर्णय

रोड सेफ्टीला अधिक चांगले बनवण्यासाठी केंद्र सरकारने (central government) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करन सांगितले की, कारमध्ये ६ एअरबॅग असणे अनिवार्य करण्यासाठी अध्यादेशाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व विभागातील कारमधील पॅसेंजरची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे. कारची किंमत आणि प्रकाराचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

गडकरी यांनी सांगितले की, हा निर्णय एम१ कॅटॅगरीमधील कारसाठी घेण्यात आला आहे. एम१ कॅटॅगरीमध्ये ५ ते ८ सिटर कारचा समावेश आहे. अशाप्रकारे मिड-रेंजच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग असणे अनिवार्य असेल. या नव्या निर्णयानंतर कारमध्ये दोन साइड एअरबॅग आणि दोन साईड कार्टेनसुद्धा लागतील. त्यामुळे कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांसाठीसुद्धा सुरक्षा सुनिश्चित होणार आहे.

केंद्र सरकारने (central government) यापूर्वी पहिल्या ड्रायव्हर सिटसाठी एअरबॅन अनिवार्य केलं होतं. यावर्षी १ जानेवारी २०२२पासून सर्व कारमध्ये ड्रायव्हरसह को-पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कारमध्ये दोन एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर निश्चितपणे कार कंपन्यांचा खर्च वाढणारा आहे. एक एअरबॅगची किंमत १८०० ते २००० रुपयांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत ६ एअरबॅग लावण्यासाठी एकूण १० ते १२ हजार रुपये खर्च होणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या मते एअर बॅगची मागणी वाढल्याने याची किंमत कमी होणार आहे.

रस्ते दुर्घटनेमध्ये जीव गमावणाऱ्यांमध्ये भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. नितीन गडकरी वेगवेगळ्या मंचावरून यामध्ये घट करण्यासाठी मत मांडत असतात. आता सरकारच्या या पावलाकडे त्याचाच एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *