लक्ष्मीपुरीतील पोलीस कॉन्स्टेबलला अटक

नागाळा पार्क येथील बांधकाम व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग मर्दाने (वय 35 राहणार शिंगणापूर तालुका करवीर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज (सोमवार) अटक केली. लाचखोरी प्रकरणी मर्दाने यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, नागाळा पार्क येथील बांधकाम व्यावसायिक अनिल धीरज साखळकर यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास दिग्विजय मर्दाने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याचे आमिष दाखवून मर्दाने याने व्यावसायिकाकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी त्याने पंचवीस हजार रुपये यापूर्वी उकळले होते.उर्वरित पंचवीस हजार रुपयांसाठी पोलीस कॉन्स्टेबलचा व्यवसायिक साखरकर यांच्याकडे तगादा सुरू होता. अखेर पंचवीस हजार रुपयांपैकी दहा हजार रुपयांवर तडजोड झाली.

बांधकाम व्यावसायिक साखळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. 27 डिसेंबर रोजी मागणीसंदर्भात पडताळणी झाली होती. त्यामध्ये यापूर्वी 25 हजार रुपये आपण लाच म्हणून स्वीकारली आहे. उर्वरित रक्कमेची मर्दाने याने मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते.

संतोष परब हल्‍ला प्रकरण : हायकोर्टाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटक कारवाईस २७ जानेवारीपर्यंत अंतरिम संरक्षण
त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे असे पोलीस उपअधीक्षक बुधवंत यांनी सांगितले. लाच प्रकरणी पोलिसाला अटक करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *