सलमानला आली जेलमधील दिवसांची आठवण!
आयुष्यातल्या ज्या कटू आठवणींवर बोलणं सलमान(Salman Khan) नेहमी टाळतो त्याच गोष्टींवर बोलायची जेव्हा त्याच्यावर वेळ येते तेव्हा तो तितक्याच निधड्या छातीनं बिनधास्त त्यावर बोलतो. आता चेहऱ्यावर हासू ठेवून तो वेळ मारून नेतो पण त्याच्या डोळ्यातील भाव त्याच्या मनात चाललेल्या द्वंद्वाचा ठाव घेण्यात मदत करतात हे ही तितकच खरंय. ‘बिग बॉस’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना अशीच वेळ पुन्हा त्याच्यावर आली पण तिथंही त्यानं कच खाल्ली नाही तो बिनधास्त त्यावर बोलला. हो,सलमाननं त्याच्या जेलमधील दिवसांवर भाष्य केलंय. आणि ही वेळ त्याच्यावर आणली राखी सावंत अन् देबोलिना या बिग बॉसच्या घरातील सदस्यांमुळे. काय झालं नेमकं. सविस्तर वाचा.बिग बॉसच्या(Big boss) नुकत्याच प्रसारित झालेल्या भागाध्ये, घरातील ‘पर्दाफाश रिपोर्टिंग’ दाखवण्यात आलं आहे. ज्यात घरातील सदस्य एकमेकांची पोलखोल करताना दिसले. या टास्कमध्ये तेजस्वी प्रकाशने अभिजित बिचुकलेबाबत एक धक्कादायक खुलासा केला. ती म्हणाली की, ‘अभिजित बिचुकलेनं एका म्युझिक व्हिडीओसाठी ६ तासांचा किसिंग सीन दिला आहे.’ तेजस्वीचा बिचुकलेबाबतचा हा खुलासा ऐकल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्य हैराण झालेला पाहायला मिळाले. दरम्यान याच एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना काही पत्रकार प्रश्न विचारताना दिसले. या एपिसोडमध्ये रश्मि देसाई आणि अभिजित बिचुकले यांच्या जोरदार वाद झालेला पहायला मिळाला. पत्रकारांच्या प्रश्नावर रश्मि देसाई, अभिजित बिचुकलेचे महिलांबाबत अतिशय वाईट विचार आहेत असं बोलताना दिसले. ज्यावर बिचुकले तिच्यावर भडकला आणि तिचं पूर्ण कुटुंब मूर्ख आहे असं म्हणाला.या भागात अभिजित बिचुकले केवळ घरातील सदस्यांशीच नाही तर गेस्टसोबतही बेशिस्तपणा करताना आणि त्यांना उलट उत्तर देताना दिसला. ज्यामुळे सलमान खान आणि अभिजित बिचुकले यांच्यात वाद झाला. घरातील सदस्यांसोबतच सलमान खानही या भागात अभिजित बिचुकलेवर चिडलेला दिसला. पण याच चिडण्यामुळे सलमान मात्र पुढे रागात थेट आपल्या जेलच्या दिवसांवरच भाष्य करून बसला नं. त्याचं झालं असं की याच भागात देबोलिनानं राखीला जेल झाली होती असा तिचा पर्दाफाश केला, पण तिथे तिला लगेच थांबवत सलमान मध्येच म्हणाला,”मग त्यात काय,तुमच्या शो चा होस्टही जेलमध्ये जाऊन आलाय”. तो प्रसंग तिथेच थांबला. पण हा भाग प्रसारीत झाल्यावर उगाचच सलमानच्या जेल जाण्यावरून पुन्हा थांबलेली चर्चा सुरू झाली ना. आता असं रागात सलमान उगाच केलेल्या त्या गुन्ह्यांमागचं सत्य सांगून बसला तर बिग बॉस नक्कीच भारी पडेल नं त्याला.