श्रेयस अय्यर विराट कोहलीची जागा घेणार?
विराट कोहलीने नुकतीच कसोटी संघाचे नेतृत्व सोडले. यापूर्वी त्याने टी २० संघाचे आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोरचेही (Royal Challengers Bangalore) नेतृत्व सोडले होते. त्यामुळे आयपीएलच्या (IPL) पुढच्या हंगामात आरसीबीचा (RCB) नवा कॅप्टन कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात अचानकपणे श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) नाव पुढे येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर असू शकतो.विराट कोहलीने नुकतीच कसोटी संघाचे नेतृत्व सोडले. यापूर्वी त्याने टी २० संघाचे आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोरचेही (Royal Challengers Bangalore) नेतृत्व सोडले होते. त्यामुळे आयपीएलच्या (IPL) पुढच्या हंगामात आरसीबीचा (RCB) नवा कॅप्टन कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात अचानकपणे श्रेयस अय्यरचे (Shreyas Iyer) नाव पुढे येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर असू शकतो.याचबरोबर सूत्राने सांगितले की, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) देखील श्रेयसवर नजर ठेवून आहेत. अय्यरला देखील आता ज्या फ्रेंचायजीकडून खेळणार आहे त्याचा कर्णधार होण्याची इच्छा आहे. दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर ऋषभ पंतला कर्णाधार केले होते. त्यानंतर श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) रामराम ठोकला. त्यानंतर त्याने लखनौ आणि अहमदाबादचा संघाकडेही तो गेला नाही कारण दोन्ही संघ त्याला कर्णधार करणार नव्हते.