सात वर्षात पेट्रोल-डिझेल सर्वात महाग, नागरिकांना झटका!
जगभरातील राजकारणात चालू असलेल्या घडामोडी आणि ओमिक्रॉन (Omicron) ची चिंता कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहे. सध्या कच्च्या तेलाचे भाव वाढून ८७ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या सात वर्षांतील हे सर्वात जास्त दर आहेत. साप्ताहिक आधारावर हा ५ वा आठवडा असून त्यात तेलाच्या किमती खूप वाढल्या आहेत. ऑक्टोबर २०१४ साली अशाप्रकारे तेलाच्या किंमती खूप वाढल्या होत्या. जाणकारांच्या मते, सध्या कच्च्या तेलाची मागणी जास्त असून पुरवठा कमी असल्यामुळे दर वाढले आहे. जगभरातील व्यावसायिक उलाढालींमध्ये तेजी आल्यामुळे कच्चा तेल्याच्या किंमती आगामी काळात वाढल्या आहेत. त्यामुळे भारत सरकारला पेट्रोल- डिझेलच्या किंमतींवर नियंत्रण राखणे जड जाणार आहे. याचा फटका ग्राहकांना बसणार आहे. १ डिसेंबर २०२१ मध्ये कच्च्या तेलाचे भाव ६९ डॉलर प्रति बॅरल होते. फक्त सहा आठवड्यात गे भाव २५ टक्क्यांनी वाढले आहेत. जाणकारांनुसार, तेल उत्पादना क्षमतेत वाढ होण्याची शक्यता असल्याचे वाटत नाही. उत्पादन वाढण्यासाठी नवी गुंतवणूकही होतत नोही. ओमिक्रॉनचं संकट आता कुठे कमी होतंय. त्यानंतर आता मागणी वाढल्यामुळे तेलाच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत.