गोव्यात आपच्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला, केजरीवालांनी केली घोषणा

आम आदमी पक्षाने गोव्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून ऍड. अमित पालेकर यांच्य नावाची घोषणा केली आहे. बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार आतिशी, आप गोवा संयोजक राहुल म्हांबरे, अमित यांच्या मातोश्री ज्योती आणि पत्नी रसिका पालेकर उपस्थित होत्या. (Goa election 2022)

केजरीवाल यांनी सांगितले की, आपला गोव्यात बदल करायचा आहे. येथील भ्रष्ट व्यवस्था बदलून प्रामाणिक सरकार आणायचे आहे. यासाठीच अमित यांच्यासारख्या जनतेसाठी सतत कार्यरत असणाऱ्या उमेदवाराची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे.आम आदमी पक्षाने गोव्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून ऍड. अमित पालेकर यांच्य नावाची घोषणा केली आहे. बुधवारी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार आतिशी, आप गोवा संयोजक राहुल म्हांबरे, अमित यांच्या मातोश्री ज्योती आणि पत्नी रसिका पालेकर उपस्थित होत्या. (Goa election 2022)

केजरीवाल यांनी सांगितले की, आपला गोव्यात बदल करायचा आहे. येथील भ्रष्ट व्यवस्था बदलून प्रामाणिक सरकार आणायचे आहे. यासाठीच अमित यांच्यासारख्या जनतेसाठी सतत कार्यरत असणाऱ्या उमेदवाराची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली आहे.गोव्यात भंडारी समाजाची संख्या जास्त असूनही मुक्तीपासून आजपर्यंतच्या ६० वर्षात केवळ एकदाच भंडारी समाजाचा मुख्यमंत्री झाला होता. आम्हाला जातीचे राजकारण करायचे नाही तर अन्य पक्षांनी भंडारी समाजावर केलेला अन्याय दूर करायचा आहे. म्हणूनच अमित पालेकरांना निवडण्यात आले आहे. ते भंडारी समाजचा असले तरी गोव्यातील सर्व जाती, धर्मांच्या लोकांसाठी काम करतील अशी खात्री आम्हाला आहे.अमित पालेकर यांनी केजरीवाल आणि आपचे आभार मानले. ते म्हणाले की माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरवणे हे केवळ आपमध्येच होऊ शकते. भ्रष्टाचारमुक्त गोवा घडविण्यासाठी मतदारांनी आपला एक संधी द्यावी. चांगला गोवा घडवण्याची जबाबदारी आपची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *