कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्ष निवड : मुश्रीफ की पी.एन.?

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड (election) ( कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्ष निवड ) गुरुवारी (दि. 20) होणार आहे. मात्र, नेत्यांचे रुसवे-फुगवे आणि आघाडीअंतर्गत झालेली पाडापाडी या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आघाडीची बैठकच अद्याप झालेली नाही. अंतर्गत वादावरील चर्चा टाळण्यासाठी ही बैठकही निवडीपूर्वी काही तास अगोदर घेतली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष हसन मुश्रीफ आणि माजी अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ( कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्ष निवड ) गुरुवारी (दि. 20) दुपारी तीन वाजता नूतन संचालकांची बैठक होणार आहे. दरम्यान, अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी नावे निश्चित करण्यासाठी गुरुवारी सकाळीच शासकीय विश्रामधाम येथे सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (election) सत्तारूढ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी विरोधी आघाडीला मिळालेल्या जागांवरून नेत्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या नावावर नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकली नाही. प्राथमिक चर्चा करण्यासाठी सोमवारी सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे ही बैठक झाली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे नेते मुंबईला गेल्यामुळे कोल्हापुरात बुधवारी ही बैठक होऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *