पुण्यात आणखी एका लसीची निर्मिती होणार, मांजरीत लवकरच उत्पादन
राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोना (corona) बाधितांचा आकडा वाढत असला तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा नागरिकांसह डॉक्टर, परिचारीका कोरोना बाधित होत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येथील ससून रुग्णालयाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. ससूनमध्ये डॉक्टर्स, नर्ससह 284 जण पॉझिटिव्ह सापडले आहे. दरम्यान, पुण्यात कोव्हिल्डशिडबरोबरच आता आणखी एका लसीची निर्मिती होणार आहे. मांजरीत लवकरच या लसचे उत्पादन घेतले जाणार आहे.
पुण्याच्या मांजरीत लस निर्मिती होणार असल्याने याचा फायदा राज्याला होणार आहे. भारत बायोटेकच्या मांजरीतील प्रकल्पाची औषध मानक नियंत्रण संस्थेच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. दोन आठवड्यात लस उत्पादन सुरु होण्याची शक्यता आहे. मांजरीत कोवॅक्सिनची निर्मिती होणार असून साडेसात कोटी डोस तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 26 टक्क्यांवर कायम आहे. रविवारी पुन्हा दहा हजारांच्यावर कोरोना रुग्णसंख्या होती. दिवसभरात 10102 रुग्ण सापडले तर 5405 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 60 हजारांवर पोहोचली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांपैकी फक्त 2332 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
कोरोनाचा फटका पुणे विमानसेवेला
वाढत्या कोरोनाचा (corona) फटका पुणे विमानसेवेला बसला आहे. प्रवासी संख्ये अभावी दररोज विमानतळावरुन 20 ते 25 विमान उड्डाणे होतायत रद्द करण्यात येत आहेत. दररोज 70 ते 75 विमानांची उड्डाणे पुणे विमानतळावरुन व्हायची. मात्र कोरोनाचा धसका प्रवाशांनी घेतल्याने काही विमानात पाच ते दहा प्रवासी प्रवास करत आहेत. दररोज पुणे विमानतळावरुन 17 ते 18 हजार प्रवासी प्रवास करत होते. मात्र आता ही संख्या घटून दहा हजारांच्या घरात आहे. रद्द होणाऱ्या विमानांमध्ये दिल्ली, जयपूरला जाणाऱ्या विमानांचा समावेश आहे.