गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी हैराण करणारं प्रकरण समोर

(crime news) बिहारमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका युवकाला आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न (Love Marriage) करायचं होतं. मात्र, त्याचे नातेवाईक यासाठी तयार नव्हते. यानंतर युवकाने जे काहू केलं ते जाणून पोलीसही हैराण झाले. या युवकाने आपल्या खुनाचा (Fake Murder Case) बनाव रचला.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांना समजलं की बिहारच्या छपरा जिल्ह्यातील बलुआ टोला गावातील 22 वर्षीय मुन्ना शाह याची हत्या झाली आहे. पोलिसांना समजलं की प्रेम प्रकरणामुळे त्याची हत्या केली गेली आणि यानंतर त्याचा मृतदेह गायब केला गेला. यानंतर पोलिसांनी युवकाचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली.

बरेच दिवस शोध घेऊनही पोलिसांना काहीच समजलं नाही. त्यामुळे अखेर या तरुणाला मोबाईक ट्रॅक करण्यात आला. यानंतर जे काही समोर आलं, ते जाणून पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी सांगितलं की तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. गावातील नदी आणि तलावातही त्याचा मृतदेह शोधण्यात आला मात्र काहीच तपास लागला नाही.

पोलिसांनी तीन दिवस कडाक्याच्या थंडीत त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याचा मोबाईल ट्रॅक करण्यात आला. मोबाईल ट्रेसिंगनंतर अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली. यानंतर पोलिसांना समजलं की युवकाने प्रेयसी आणि आपल्या मित्रांसोबत मिळून स्वतःच्याच हत्येचा बनाव रचला आहे. (crime news)

मोबाईल ट्रेकिंगच्या आधारे पोलिसांनी दरियापूर येथून युवकाला अटक केली. तपासात पोलिसांनी मुन्ना शाहच्या हत्येच्या आरोपात ज्या पाच आरोपींना अटक केली होती, त्यांना सोडून दिलं आहे. पोलिसांनी मुन्ना शाहची चौकशी केली असता, यात त्याची गर्लफ्रेंडही सहभागी असल्याचं समजलं. आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी घरच्यांना मनवण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी मुन्नाने हा बनाव रचला होता. जेणेकरून त्याला आपल्या प्रेयसीसोबत लग्नही करता येईल आणि कुटुंबीयही त्याला अडवणार नाहीत.

दुसरं लग्न केलं म्हणून गावासमोर भयावह शिक्षा; 2 तास सुरू होता धक्कादायक प्रकार

पोलिसांनी सांगितलं की यासाठी मुन्ना याने एक कार भाड्याने घेतली आणि बल्ड बँकेतून रक्त आणून ते रस्त्यावर शिंपडलं, यानंतर तो गायब झाला. मात्र मोबाईलने त्याची पोलखोल केली. युवकाने सांगितलं की त्याचं आपल्या गर्लफ्रेंडवर खूप प्रेम आहे आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *